‘कोरोना सुरक्षित ग्राम’ मोहिम यशस्वी करा : सभापती डॉ. भूमिका बेरगळ ; कोरोना या संसर्गजन्य रोगाची साखळी तोडण्यासाठी सदरची मोहीम महत्वाची 

‘कोरोना सुरक्षित ग्राम’ मोहिम यशस्वी करा : सभापती डॉ. भूमिका बेरगळ ; कोरोना या संसर्गजन्य रोगाची साखळी तोडण्यासाठी सदरची मोहीम महत्वाची 


 


‘कोरोना सुरक्षित ग्राम’ मोहिम यशस्वी करा : सभापती डॉ. भूमिका बेरगळ ; कोरोना या संसर्गजन्य रोगाची साखळी तोडण्यासाठी सदरची मोहीम महत्वाची 
माणदेश एक्सप्रेस टीम आटपाडी/धिरज प्रक्षाळे :  ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या कोरोना विरुद्धच्या लढ्यातील यशस्वी मोहिमेनंतर आता शासनाने ‘कोरोना सुरक्षित ग्राम’ मोहीम सुरु केली असून सदरची मोहीम ही कोरोना या  संसर्गजन्य विषाणूजन्य रोगांची साखळी तोडण्यासाठी महत्वाची असल्याने ती मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन आटपाडी पंचायत समितीच्या सभापती डॉ. भूमिका बेरगळ यांनी केले. आटपाडी पंचायत समिती कार्यालयात ‘कोरोना सुरक्षित ग्राम’ मोहिम’ याविषयी पत्रकार पत्रकार परिषद संपन्न झाली. यावेळी सभापती डॉ. भूमिका बेरगळ, माजी सभापती व विद्यमान सदस्य हर्षवर्धन देशमुख, उपसभापती रुपेश पाटील, यांच्यासह गटविकास अधिकारी मनोज भोसले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.‘कोरोना सुरक्षित ग्राम’ मोहिमेचा कालावधी हा दिनांक ५/१०/२०२० ते ३१/१०/२०२० असा आहे. यामध्ये कोरोना सुरक्षित ग्राम समितीची स्थापना करणे, कोरोनामुक्त मोहिमेबाबत जनजागृती करणे तसेच कोरोनामुक्त गाव मोहिमेसाठी गावकऱ्यांनाही काही निकष पाळावे लागणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने मास्क असल्याशिवाय सावर्जनिक, गर्दीच्या व व्यवसायाच्या ठिकाणी कोणतही वस्तू त्या नागरिकाला मिळणार नाही. तसेच परगावी जाणाऱ्या व येणाऱ्या नागरिकांची नोंदणी करणे, जलद आरोग्य तपासणी करणे, गावस्तरावर कोविड योद्धे तयार करणे, आरोग्य शिक्षण मोहीम राबविणे ही महत्वाची कामे करावी लागणार आहेत.यासाठी शासनाने बक्षीस ठेवले असून यामध्ये तालुक्यातील सर्व गावांनी सहभाग घ्यावा. यामधून तीन गावांची प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कारसाठी निवड करण्यात येणार असल्याचे सभापती डॉ. भूमिका बेरगळ म्हणाल्या. तर सदर योजनेविषयी गटविकास अधिकारी मनोज भोसले यांनीही मार्गदर्शन करून ‘कोरोना सुरक्षित ग्राम’ मोहिमेत तालुक्यातील सर्व गावांनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले.  


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments