देवेंद्र फडणवीस कोरोनामुक्त होण्यासाठी आम. गोपीचंद पडळकरांचे देवीला साकडे

देवेंद्र फडणवीस कोरोनामुक्त होण्यासाठी आम. गोपीचंद पडळकरांचे देवीला साकडे


 


 


देवेंद्र फडणवीस कोरोनामुक्त होण्यासाठी आम. गोपीचंद पडळकरांचे देवीला साकडे
माणदेश एक्सप्रेस टीम 


 आटपाडी/धिरज प्रक्षाळे : राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे लवकर कोरोनामुक्त होण्यासाठी भाजपचे प्रवक्ते व आमदार यांनी देवीला अभिषेक घालून प्रार्थना केली.


 


 देवेंद्र फडणवीस हे सध्या बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बिहार दौऱ्यावर आहेत. मात्र, गेल्या ४ ते ५  दिवसांपासून ते महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त भागांचा पाहणी दौरा करत होते. ''लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे. 


 


 
माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी. सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी !, असे ट्विट फडणवीस यांनी केली आहे. फडणवीस यांना नेमकी कोठून कोरोनाची लागण झाली, याबद्दल अद्याप माहिती नाही. मात्र, त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना काळजी घेत, कोरोना चाचणी करावी, असे आवाहन खुद्द फडणवीस यांनी केले आहे.


 


 त्यामुळे भाजपचे प्रवक्ते व आमदार गोपीचंद पडळकर यांनी देवेंद्र फडणवीस हे लवकरात लवकर कोरोना मुक्त व्हावेत व त्यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी कुलदेवी मायाक्कादेवी चरणी चिंचली (कर्नाटक) येथे अभिषेक व प्रार्थना केली असून याबाबत त्यांनी ट्वीट केले आहे.


 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a Comment

0 Comments