रामदास आठवले म्हणाले, दलित अत्याचाराविरुद्ध लढण्याबाबत संजय राऊत यांनी आम्हाला शिकवू नये ; आजपर्यंत त्यांनी कधीही दलित अन्याय, अत्याचाराविरुद्ध "ब्र" शब्दसुद्धा काढला नाही 

रामदास आठवले म्हणाले, दलित अत्याचाराविरुद्ध लढण्याबाबत संजय राऊत यांनी आम्हाला शिकवू नये ; आजपर्यंत त्यांनी कधीही दलित अन्याय, अत्याचाराविरुद्ध "ब्र" शब्दसुद्धा काढला नाही 


 


रामदास आठवले म्हणाले, दलित अत्याचाराविरुद्ध लढण्याबाबत संजय राऊत यांनी आम्हाला शिकवू नये ; आजपर्यंत त्यांनी कधीही दलित अन्याय, अत्याचाराविरुद्ध "ब्र" शब्दसुद्धा काढला नाही मुंबई : रामदास आठवले आठवले यांच्या शिवसेनेच्या फायरब्रँड नेते खासदार संजय राऊत यांना इशारा दिला असून दलित अत्याचाराविरुद्ध लढण्याबाबत आम्हाला त्यांनी शिकवू नये असे म्हणाले असल्याने त्यांच्यातील पँथर जागा झाला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आजपर्यंत कधीही दलित अत्याचाराविरुद्ध "ब्र' शब्दसुद्धा काढला नाही. दलित अत्याचारविरुद्ध कधी ते पुढे आले नाहीत. दलित अत्याचार जिथे होईल, तेथे मी पोचलेलो आहे. दलित अत्याचाराविरुद्ध सतत लढत राहिलो आहे. "दलित पॅंथर” च्या चळवळीतून मी पुढे आलो आहे. त्यामुळे दलित अत्याचारांच्या प्रश्नांवर नेहमी मूग गिळून बसणाऱ्या शिवसेनेच्या राउतांनी आम्हाला दलित अत्याचाराविरुद्ध लढण्याचे शिकवू नये,' असा टोला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राऊत यांना लगावला आहे. त्यामुळे पुन्हा एखदा शिवसेना व आरपीआय यांच्यातील वाद उफाळून येणार आहे.संजय राऊत यांनी आठवले यांच्यावर टीका करताना हाथरस प्रकरण घडत असताना आठवले हे नटींच्या घोळक्याऊत होते, असा आरोप केला होता. त्याला उत्तर देताना आठवले यांनी म्हटले आहे की राऊत हे नटींच्या घोळक्याऊत असतात की नाही ते माहीत नाही. मी नटींच्या घोळक्यानत नसतो, तर नेहमी कार्यकर्त्यांच्या घोळक्याचत असतो. दलित अत्याचाराविरुद्ध लढणारा मी मूळ पॅंथर आहे.हाथरसची घटना घडली त्यादिवशी मुंबईत राज्यपालांची पूर्वनियोजित भेट ठरली होती. ती भेट झाल्यानंतर आम्हाला हाथरसच्या घटनेची माहिती मिळाताच त्या अमानुष घटनेचा आम्ही तीव्र निषेध, आंदोलन केले. लखनौला जाऊन उत्तर प्रदेशच्या राज्यपालांना भेटलो. हाथरसला भेट देण्यास जाताना तेथील जिल्हा प्रशासनाने सर्वच पक्षाच्या नेत्यांना भेट देण्यापासून अडविले होते. त्यामुळे मी 2 ऑक्टोजबरला हाथरस जाऊ शकलो नाही. कंगना राणावत प्रकरणात आम्ही कधीही संजय राऊत यांच्यावर टीका केली नाही, ते आमच्यावर टीका करीत असले तरी त्यातून मी त्यांच्यावर नाराज नाही. ते माझे मित्र आहेत. पायल घोष ही अभिनेत्री तिच्यावर झालेल्या अन्यायाबाबत भूमिका मांडते. ती अभिनेत्री असली तरी प्रथम ती एक महिला आहे, त्यातून आम्ही तिची बाजू घेतली. राऊत यांनी तिची बाजू घेतली का? जिथे जिथे महिलांवर दलितांवर अत्याचार होतात, तिथे तिथे आम्ही त्या महिलेची बाजू घेत आलो आहोत. दलितांच्या प्रश्नांवर आम्ही सतत लढत आलो आहोत. पण, संजय राऊत हे कधी "सामना'मधूनही दलित अत्याचाराच्या प्रश्नावर व्यक्त झाले नाहीत आणि संसदेत खासदार म्हणून ही दलित अत्याचार प्रश्नांवर त्यांनी आवाज उठविला नाही. दलितांच्या प्रश्नांवर दलित लढत असतात. पण दलितांच्या प्रश्नांसाठी सवर्ण पुढाऱ्यांनी कधी लढा उभारला आहे का? दलितांचे मतदान हवे आहे. पण, दलितांवरील अत्याचाराचा निषेध तरी यापूर्वी कधी संजय राऊत आणि त्यांच्या पक्षनेत्यांनी केला आहे का? असा सवाल आठवले यांनी उपस्थित केला. 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a comment

0 Comments