सोलापुरमध्ये रागाच्या भरात भावानेच केली भावाची हत्या 


 


सोलापुरमध्ये रागाच्या भरात भावानेच केली भावाची हत्या 


 


सोलापूर : महाराष्ट्रात खून, मारामारी अशा अनेक घटना घडत आहेत. अशातच सोलापुरमध्ये रागाच्या भरात एका छोट्या भावाने आपल्याच मोठ्या भावाची हत्या केलीय. सोलापुरातील तक्षशिला नगर, कुमठा नाका परिसरात ही घटना घडलीय. रोहित बनसोडे असे मयत तरुणाचे नाव असून त्याचा लहान भाऊ राकेश बनसोडे याने ही हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपी राकेश बनसोडे याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांमार्फत देण्यात आली आहे.मयत रोहित बनसोडे आणि राकेश बनसोडे हे दोघे भाऊ एकत्रित राहत होते. रविवारी (4 ऑक्टोबर) रोजी दुपारच्या सुमारास रोहित आणि राकेश यांच्यात किरकोळ कारणावरुन भांडण झालं. आरोपी राकेश याने मोठा भाऊ रोहित याला 'तू वाईट संगतीतील मुलांसोबत का फिरतो?' अशी विचारणा केली. यावरुन दोघांमध्ये वाद झाला. मयत रोहित याने आरोपी राकेश याला हाताने मारहाण केली. यावेळी आरोपी राकेश हा रागाच्या भरात घरातून निघून गेला.रात्री 1.30 च्या सुमारास मयत रोहित बनसोडे याचा मित्र सुरज कसबे हा घरी आला होता. सुरज याने रोहित याला आवाज दिला मात्र आतून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद येत नव्हता. यावेळी सुरज याने पाठीमागील भिंतीवरुन घरात प्रवेश केला असता रोहित हा रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत असल्याचे दिसले. सुरज कसबे याने घाबरुन ही माहिती पोलिसांना कळवली. नियंत्रण कक्षाद्वारे ही माहिती कळवल्यानंतर जोडभावी पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक तरुण संशयास्पदरित्या फिरत असल्याचे पोलिसांना निदर्शनास आले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली.मयत रोहित बनसोडे हा आपला मोठा भाऊ असून तो वारंवार आपला अपमान करत होता. किरकोळ कारणावरुन मारहाण करत होता. रविवारी देखील रोहित याने मारहाण केली होती. त्याच रागात आपण घरातील लोखंडी बटाने डोक्यावर मारहाण केली. अशी कबुली आरोपी राकेश बनसोडे याने दिली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक बजरंग साळुंखे यांनी दिली. या प्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात भांदवि 302, 323 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सपोनि सोळुंके हे करत आहेत.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured