हरियाणाचे उपमुख्यमंत्री आणि जननायक जनता पक्षाचे नेते दुष्यंत चौटाला यांनाही कोरोनाची लागण

हरियाणाचे उपमुख्यमंत्री आणि जननायक जनता पक्षाचे नेते दुष्यंत चौटाला यांनाही कोरोनाची लागण


 


हरियाणाचे उपमुख्यमंत्री आणि जननायक जनता पक्षाचे नेते दुष्यंत चौटाला यांनाही कोरोनाची लागणनवी दिल्ली – एकीकडे देशात कोरोना विषाणूची  संख्या कमी झाल्याचे पाहायला मिळते. पण मंगळवारी हरियाणाचे उपमुख्यमंत्री आणि जननायक जनता पक्षाचे नेते दुष्यंत चौटाला यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी राज्यात अनेक मंत्री आणि नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे आणि आता त्यात दुष्यंत यांचे देखील नाव जोडले गेले आहे. 


 


दुष्यंत चौटाला यांनी स्वत: ट्वीट करत याबदल माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे, सर्व सहकाऱ्यांसाठी सूचना – माझा कोविड-19 चा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोरोना चाचणी करून घ्यावी, असेदेखील आवाहन त्यांनी केले आहे. 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments