"गो कोरोना गो" ची घोषणा देणारे रामदास आठवले  कोरोनाग्रस्त

"गो कोरोना गो" ची घोषणा देणारे रामदास आठवले  कोरोनाग्रस्त


 


"गो कोरोना गो" ची घोषणा देणारे रामदास आठवले  कोरोनाग्रस्त मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना कोरोनाची लागण झाली आहे. रामदास आठवले यांनी काल कोरोनाची चाचणी केली होती. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.रामदास आठवलेंच्या उपस्थितीत अभिनेत्री पायल घोष हिने पक्ष प्रवेश केला. यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर रामदास आठवलेंनी कोरोनाची चाचणी केली होती. या चाचणीचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. आता कोरोनावरील उपचारांसाठी रामदास आठवले हे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल होणार आहेत. तसेच, संपर्कात आलेल्या लोकांनी सुद्धा कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन रामदास आठवलेंकडून करण्यात आले आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments