गायक जान कुमार सानूला थेट मुंबईतून हाकलून देण्याचा मनसेचा इशारा

गायक जान कुमार सानूला थेट मुंबईतून हाकलून देण्याचा मनसेचा इशारा


 


गायक जान कुमार सानूला थेट मुंबईतून हाकलून देण्याचा मनसेचा इशारा मुंबई: गायक जान कुमार सानूला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं थेट धमकी दिली आहे. मला मराठी भाषेची चीड येते, असं विधान जान कुमार सानूनं बिग बॉसमध्ये केलं. यावरून महाराष्ट्र चित्रपट सेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबईत राहून आता तुझं करिअर कसं बनतं जान सानू तेच बघतो मी, असा थेट इशारा  मनसेचे  नेते अमेय खोपकर यांनी दिला आहे. 


 


बिग बॉसच्या १४ व्या हंगामात निक्की तांबोळी आणि जान कुमार सानू यांच्यात वाद झाला. त्यावेळी निक्की तांबोळी मराठीत बोलत होती. त्यावरून जाननं राग व्यक्त केला. मला मराठी भाषेची चीड येते, असं जाननं म्हटलं. यावरून आता मनसेनं आक्रमक भूमिका घेत जानला थेट इशारा दिला आहे. 'जान कुमार सानू... मराठी भाषेची याला चीड येते म्हणे. अरे तू कीड आहेस मोठी... मुंबईतून हाकलून देण्यासाठी मी नॉमिनेट करतोय याला,' अशा शब्दांत खोपकर यांनी संताप व्यक्त केला आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments