पुण्यात देहुरोडवरील नर्हे आंबेगावच्या पेट्रोल पंपासमोर  भीषण अपघात  

पुण्यात देहुरोडवरील नर्हे आंबेगावच्या पेट्रोल पंपासमोर  भीषण अपघात  

 पुण्यात देहुरोडवरील नर्हे आंबेगावच्या पेट्रोल पंपासमोर  भीषण अपघात  


 


कात्रज - देहुरोड रोडवरील नर्हे आंबेगावच्या पेट्रोल पंपासमोर मंगळवारी ( दि. ६)  सकाळी साडे दहाच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात एकजण जागीच ठार तर पाच जण जखमी झाले आहेत. ऑर्किड स्कूलच्या समोर हा अपघात घडला. मालट्रकची धडक इतकी भीषण होती की समोरील एक पिकअप टेम्पो थेट बाजूच्या चारीत कोसळून पडला.


 


 


याबाबत अधिक माहिती अशी की, सकाळी साडेदहाच्या दरम्यान  भरधाव वेगातील ट्रक हा कात्रजकडून नवले ब्रीजकडे निघाला होता. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. एम.एच.12, एच.सी.7299 या क्रमांकाचा ट्रक असून, त्याने वाहनांना चिरडले आहे. घटनेची माहिती मिळताच, सिंहगड पोलिस व वाहतूक विभागाने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात हलवले आहे. अपघात एवढा भीषण आहे की, त्यामध्ये ट्रकच्या धडकेने अनेक दुचाकी रस्त्याच्या बाजूला फेकल्या गेल्या आहेत. 


 भरधाव वेगातील ट्रकने, चार चाकी व दुचाकी अशा दहा वाहनांना पाठीमागून चिरडले. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून, पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली. वाहने रस्त्यावर असल्याने एका बाजूचा रस्ता पूर्ण बंद करण्यात आला  आहे, त्यामुळे संपूर्ण वाहतुकीचा ताण हा एका बाजूवर येऊन मुंगीच्या गतीने वाहने पुढे सरकत आहेत. क्रेनच्या सहाय्याने मालट्रक आणि अपघातग्रस्त वाहने उचलण्यास सुरुवात झाली असून याबाबत अधिक तपास भारती विद्यापीठ पोलिस करत आहेत.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments