आरोग्य विभागाचा जनतेच्या जिवाशी खेळ ,जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनास बसणार ; आमदार सातपुतेंचा इशारा


 


आरोग्य विभागाचा जनतेच्या जिवाशी खेळ ,जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनास बसणार ; आमदार सातपुतेंचा इशारा


 


माळशिरस  :   शहरांपाठोपाठ  ग्रामीण भागातही  कोरोनाचा प्रदुर्भाव  वाढत आहे.  ग्रामीण भागातील नागरिकांनाही आरोग्य सुविधांच्या  अभावाला सामोरे जावे लागत  आहे.  यापार्शवभूमीवर  माळशिरसचे  आमदार राम सातपुते यांनी माळशिरस  तालुक्यातील जनतेच्या जीवाशी आरोग्य विभाग खेळ खेळात असल्याचा  आरोप केला आहे. तसेच  मागणीनुसार डॉक्टतर, नर्स व इतर आरोग्य विभागातील पदे त्वरित न भरल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनास बसणार, असा इशारा माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी दिला. माळशिरस तालुक्यासची लोकसंख्या पाच लाखांच्या पुढे असून तालुक्यासत एक हजार 136 बेडची आवश्यचकता आहे. माळशिरस तालुक्यासत सध्या आनंदी गणेश, महाळुंग व नातेपुते येथील मधुर मीलन मंगल कार्यालय या तीन ठिकाणी कोव्हिड केअर सेंटर सुरू आहे. या ठिकाणी 300 बेडची सुविधा आहे. या तीन ठिकाणांसाठी आरोग्य विभागाने मागील पाच महिन्यांपासून पाच डॉक्ट र व नऊ स्टाफ नर्स यांची नियुक्ती केलेली आहे. वास्तविक पाहता माळशिरस तालुक्यानत 12 एमबीबीएस डॉक्टेर, 60 आयुष डॉक्टसर, 200 स्टाफ नर्स, 12 औषध निर्माण अधिकारी, 12 लॅब टेक्निाशियन, 60 वॉर्डबॉय, 60 स्वीपर आणि 12 सिक्युवरिटी व इतर सर्व आरोग्यविषयक साहित्य आणि मनुष्यबळ यांची मागणी वेळोवेळी माळशिरस तालुक्याातील आरोग्य विभागाने जिल्ह्याच्या ठिकाणी केलेली आहे, असे सातपुते म्हणाले आहेतमात्र’ राज्य सरकारने सांगूनही कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग तातडीने वरील पदांची भरती करीत नाही. उलट शेजारील पुणे जिल्ह्यात आरोग्य विभागाने अनेक रिक्त पदांवर भरती केलेली आहे. असे सातपुते म्हणाले आहेत . दरम्यान सध्या माळशिरस तालुक्यावत चार हजार 59 कोरोनाबाधित असून त्यापैकी दोन हजार 595 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजअखेर 78 लोकांचा तालुक्या त मृत्यू झाला असून एक हजार 386 रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. माळशिरस तालुक्याळत किमान सात ठिकाणी कोव्हिड केअर सेंटर असणे गरजेचे आहे


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured