सांगलीत पार्सल देण्याचा बहाणा करून फसवणूक  :  साडेसहा हजारांना गंडा


 


सांगलीत पार्सल देण्याचा बहाणा करून फसवणूक  :  साडेसहा हजारांना गंडासांगली : सध्या अनेक फसवणुकीच्या घटना घडत असून मोबाईल धारकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. कारण सांगलीत पार्सल देण्याचा बहाणा करत मोबाईलवर ऍप डाउनलोड केल्यानंतर साडेसहा हजारांना गंडा घालण्यात आल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी अज्ञाताविरोधात संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीपात रामचंद्र ओगले( वय 62) माधवनगर यांनी फिर्याद दिली


 


श्रीपात ओगले यांना काल दुपारी एकच्या सुमारास अज्ञाताचा फोन आला. त्यानंतर त्याने ओगले यांना तुमचे पार्सल थाबविण्यात आल्याचे सांगितले. ते परत पाठविण्यासाठी 10 रूपये ऑनलाइन भरावे लागतील अशी बतावणी केली. त्यानंतर ऍनिडिस्क हे ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करण्यास सांगितले.


 


डाउनलोड केल्यानंतर एटीएम कार्ड क्रमांक, कालबाह्य दिनांक यासह सारी माहिती भरून घेतली. त्यानंतर बॅंक खात्यातून पहिल्यांदा 5997 रूपये काढून घेतले. त्यानंतर पुन्हा सहाशे रुपये काढले. फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर संजयनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी अज्ञाताविरोधात फसवणूकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. पोलिस अधिक तपास करत आहेत. 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured