बिहारच नाही तर देशातील सर्व नागरिकांना कोरोनाची लस मोफत 

बिहारच नाही तर देशातील सर्व नागरिकांना कोरोनाची लस मोफत 


 


बिहारच नाही तर देशातील सर्व नागरिकांना कोरोनाची लस मोफत 


 


नवी दिल्ली :  बिहारच नाही तर देशातील सर्व नागरिकांना कोरोनाची लस मोफत मिळणार.बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने जाहीर केलेल्या जाहिरनाम्यात बिहारच्या जनतेला सत्तेत आल्यावर मोफत लस देण्याचं आश्वासन देण्यात आलं आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात लशीवर पुन्हा एकदा गदारोळ सुरू झाला.


 


 विरोधी पक्षांसह अनेक राज्य सरकारांनी सरकारच्या या आश्वासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकारला घेराव घातला. मात्र कोरोना लशीसंदर्भात वाढलेला राजकीय संघर्ष पाहता आता केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी यांनी मोठे विधान केलं आहे.  ओडिशाच्या बालासोरमध्ये केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी म्हणाले की याविषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत चर्चा सुरू आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a comment

0 Comments