अभिनेत्री कंगना रानौत आणि तिची बहिण रंगोलीला मुंबई पोलिसांनी समन्स

अभिनेत्री कंगना रानौत आणि तिची बहिण रंगोलीला मुंबई पोलिसांनी समन्स

 मुंबई : अभिनेत्री कंगना रानौत आणि तिची बहिण कायम कोणत्याही मुद्द्यावर आपलं परखड मत मांडतात. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर केलेल्या वक्तव्यांमुळे कंगना कामय चर्चेत होती. त्यामुळे मुंबई पोलिसांनी कंगना आणि तिची बहिण रंगोलीला समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. 
कंगना आणि तिची बहिण रंगोली यांना २३ आणि २४ नोव्हेंबरला वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी हजर राहण्याचा समन्स पाठवण्यात आला आहे.या दोघींनी आपल्या भावाच्या लग्नकार्यात व्यस्त असल्याचे सांगत चौकशीसाठी गैरहजर राहिल्या होत्या. कास्टिंग दिग्दर्शक साहिल अशरफ सैयद यांच्या तक्रारीनंतर वांद्रे कोर्टाने कंगना आणि रंगोलीविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.  
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a comment

0 Comments