‘बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण’ : एनसीबीच्या पथकाची प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहच्या घरी धाड

‘बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण’ : एनसीबीच्या पथकाची प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहच्या घरी धाड

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत ‘बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण’ समोर आलं आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाद्वारे या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. लक्षवेधी बाब म्हणजे या चौकशीदरम्यान सारा अली खान, रकुल प्रित सिंह, सिमोन खंबाटा, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर, दीपिका पदुकोण, दिया मिर्झा यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांची नावं समोर आली होती. या यादीत आता प्रसिद्धी कॉमेडियन भारती सिंह हिचं देखील नाव समोर आलं आहे. एनसीबीने भारती आणि तिचा पती हर्ष यांना समन्स बजावलं आहे. भारती सिंह ही एक प्रसिद्ध विनोदी अभिनेत्री आहे.


एनसीबीच्या पथकानं प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहच्या घरी धाड टाकली. यावेळी करण्यात आलेल्या झाडाझडतीत अधिकाऱ्यांना भारतीच्या घरातून गांजा मिळाला. एनसीबीच्या मुंबईतील झोनल पथकाने ही कारवाई केली आहे. ड्रग पेडलरने दिलेल्या माहितीनंतर एनसीबीने ही कारवाई केली. दरम्यान या प्रकरणाच्या चौकशीसाठी भारती विरोधात समन्स जारी केलं आहे.


 Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments