आमदार भारत भालके यांचे निधन ; पुण्यातील रुबी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

आमदार भारत भालके यांचे निधन ; पुण्यातील रुबी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वासआमदार भारत भालके यांचे निधन ; पुण्यातील रुबी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास 


पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे आमदार भारत भालके यांचे पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना रात्री साडे बाराच्या सुमारास निधन झाले. आमदार भारत भालके हे 60 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, पुत्र भगीरथ, तीन विवाहित कन्या आणि नातवंडे असा परिवार आहे.


आमदार भारत भालके हे कोरोनामुक्त झाले होते. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली होती. दोन आठवड्यांपूर्वी त्यांना उपचारांसाठी पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र न्युमोनिया झाल्याने त्यांची प्रकृती ढासळत गेल्याने काल रात्री साडे बारा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

पंढरपूर तालुक्यातील सरकोली या त्यांच्या गावी शेतात दुपारी चार वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कायम लोकांमध्ये राहणारा पैलवानी पोशाख तसेच ग्रामीण बाजाची भाषा त्यांची जनतेत खूप लोकप्रिय होती. बेधडक बोलणारा आमदार अशी त्यांची ओळख असल्याने अधिकारी वर्गातही त्यांच्याविषयी भीतीयुक्त आदर होता. 2009, 2014 आणि 2019 असे सलग तीन वेळा भालके यांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात विजयाची हॅटट्रिक केली होती. पंढरपूर जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणातील मोठे प्रस्थ असलेल्या विजयसिंह मोहिते पाटलांना पराभूत करणारे जायंट किलर भारत भालके राज्याला परिचित झाले होते.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस v


Post a comment

0 Comments