काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन : नरेंद्र मोदींनीही केले दुःख व्यक्त
 काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन : नरेंद्र मोदींनीही केले दुःख व्यक्त
नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं बुधवारी पहाटे 3.30 वाजता निधन झालं. त्यांचे पुत्र फैसल पटेल यांनी ट्वीट करून ही माहिती दिला. एकाचवेळी त्यांचे अनेक अवयव निकामी झाल्यामुळे अहमद पटेल यांचं निधन झाल्याचं फैसल यांनी म्हटलं.त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं, कोरोनाच्या नियमांचं काटेकार पालन करत सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि कोणत्याही सामूहिक कार्यक्रमाचं आयोजन करू नका, असं आवाहन मी सर्व हितचिंतकांना करतो.
एक महिन्यापूर्वी अहमद पटेल यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. 71 वर्षांचे पटेल यांनी दिल्लीतल्या हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला.अहमद पटेल काँग्रेस पक्षाचे खजिनदार होते. अहमद पटेल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार होते, तोपर्यंत पक्षात त्यांचं मोठं वजन होतं. 1985 साली ते राजीव गांधींचे संसदीय सचिवही होते.

अहमद पटेल यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह नेत्यांनी दुःख व्यक्त केलं."अहमद पटेल यांच्या निधनामुळे दुःखी झालो. त्यांनी समाजाची सेवा करत सार्वजनिक आयुष्यात अनेक वर्षं घालवली. कुशाग्र बुद्धिमत्ता आणि काँग्रेसला सक्षम करण्यातील त्यांची भूमिका यांमुळे ते नेहमीच लक्षात राहतील. त्यांचा मुलगा फैसलशी बोललो आणि सहानुभूती व्यक्त केली," असं मोदी यांनी ट्वीट करून म्हटलं.Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a comment

0 Comments