“बकऱ्याशिवाय बकरी ईद असेल, तरच फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी करू” : साक्षी महाराज

“बकऱ्याशिवाय बकरी ईद असेल, तरच फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी करू” : साक्षी महाराज


 


“बकऱ्याशिवाय बकरी ईद असेल, तरच फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी करू” : साक्षी महाराज


 नवी दिल्ली : दिवाळीमध्ये फटाक्यांवर बंदी घालण्यावरुन उत्तर प्रदेशमधील उन्नावचे भाजप खासदार साक्षी महाराज यांच्या फेसबुक पोस्टवरुन दोन गट पडल्याचे चित्र सध्या दिसत आहे. जर बकऱ्याशिवाय बकरी ईद देशामध्ये साजरी झाली, तर दिवाळीमध्येही फटाके फोडले जाणार नसल्याचे साक्षी महाराज म्हणाले आहेत.
साक्षी महाराज यांना देखील कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले असून ते सध्या होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदुषणासंदर्भात सध्या फेसबुकवर सुरु असणाऱ्या चर्चा आणि फटाके न फोडण्याचे आवाहन करणाऱ्या पोस्ट शेअर केल्या जात आहेत. साक्षी महाराज यांनी यावरुनच टोला लगावला आहे. बकरी ईद आणि दिवाळीची तुलना करताना त्यांनी, बकऱ्याशिवाय बकरी ईद ज्या दिवशी साजरी होईल त्या दिवशीच फटाक्यांशिवाय दिवाळी सुद्धा साजरी केली जाईल. प्रदुषणाच्या नावाखाली फटाक्यांसंदर्भात जास्त ज्ञान पाजाळू नका, असे म्हटले आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a comment

0 Comments