“पाचही जागा आम्ही निवडून येऊ” : जयंत पाटील

“पाचही जागा आम्ही निवडून येऊ” : जयंत पाटील

 पुणे : अरुण लाड व जयंत आजगावकर यांच्या प्रचाराची सुरुवात आजपासून झाली. उद्यापासून पुणे जिल्ह्यात प्रचार सुरु होत आहे, असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे. आज मी शिक्षक व पदवीधर मतदारसंघाचा आढावा घेतला आहे. या बैठकीला तीनहा पक्षाचे नेते उपस्थित होते. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. 

जयंत पाटील म्हणाले की, राज्यात पाच जागांसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार लढत आहेत. पाचही जागा आम्ही निवडून येऊ. आम्ही तीनही पक्ष संयुक्त प्रचार करत आहोत, कोणी कुठे जायचे तसे सगळे ठरलेले आहे. देशातील आर्थिक मंदीमुळे पदवीधरांसमोर मोठं संकट उभं राहिले आहे. कोविडच्या आधी आर्थिक मंदी झालेली आहे, त्यामुळे यातून बाहेर काढणे गरजेचे आहे. आमचं सरकार ते करेल असंही जयंत पाटील म्हणाले. 

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a comment

0 Comments