खडसे यांच्या पक्षांतरानंतर पिंपरी-चिंचवडमधील भाजपला पहिला धक्का

खडसे यांच्या पक्षांतरानंतर पिंपरी-चिंचवडमधील भाजपला पहिला धक्का


 


खडसे यांच्या पक्षांतरानंतर पिंपरी-चिंचवडमधील भाजपला पहिला धक्कापुणे : पक्षाच्या शहर ओबीसी महिला मोर्चा अध्यक्षा सारिका पवार यांनी पद व पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. आणखी काही भाजप कार्यकर्ते पक्ष सोडणार असल्याचे पवार यांनी सांगितले. खडसे यांच्या पक्षांतराचा पिंपरी-चिंचवडमधील पहिला धक्का भाजपला बसला आहे.
पवार या भाजपची शहरात सत्ता नसल्यापासून पक्षात हिरीरीने काम करीत होत्या. गेल्या आठ वर्षात मंडलाध्यक्ष,महिला मोर्चा शहर सरचिटणीस अशी पदे त्यांनी भुषविली आहेत. दोन महिन्यापूर्वी त्यांची नियुक्ती पक्षाची शहर ओबीसी महिला मोर्चा अध्यक्ष म्हणून झाली होती. गत महापालिका निवडणुकीत २०१७ निव्वळ नाथाभाऊ समर्थक म्हणून त्यांचे तिकिट कापले गेले होते. 
नाथाभाऊ माझे नेते आहेत, असे सांगत त्यांच्या सन्मानार्थ आपण राजीनामा देत असल्याचे पवार म्हणाल्या. नाथाभाऊंचा संघर्ष माझ्यासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत त्यांनीच राजीनामा दिल्याने मी सुद्धा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.नाथाभाऊ म्हणतील ती पूर्वदिशा असे सांगत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे संकेत अप्रत्यक्षपणे दिले. शहरातील मूळचे खान्देशातील तीस-चाळीस महिला, पुरुष भाजप कार्यकर्ते येत्या काही दिवसांत पक्षाला रामराम ठोकणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments