आमची भाजी घ्या म्हणून शेतकरी मोदी साहेबांच्या गुजरातमध्ये जाणार आहेत का ? : सतेज पाटील

आमची भाजी घ्या म्हणून शेतकरी मोदी साहेबांच्या गुजरातमध्ये जाणार आहेत का ? : सतेज पाटील


 


आमची भाजी घ्या म्हणून शेतकरी मोदी साहेबांच्या गुजरातमध्ये जाणार आहेत का ? : सतेज पाटील


 कोल्हापूर : काळा कायदा जोपर्यत रद्द होत नाही तोपर्यत आपण गप्प बसायच नाही. हातचे उत्पादन काढून घेण्याचे काम केंद्रान केलाय. काँट्रॅक्ट फार्मिंगच्या नावाखाली अदानी आणि अंबानीला शेती द्यावी लागणार आहे. त्यामुळे आज जाग होण्याची गरज आहे अन्यथा पुढची पिढी माफ करणार नाही असे सतेज पाटील म्हणाले. कोल्हापूर जिल्हा कॉंग्रेसतर्फे झालेल्या आंदोलनादरम्यान ते बोलत होते


 
शेतकरी हा देशाचा कणा आहे पण त्याचा आवाज दाबून हा कायदा रेटण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही हा कायदा अमलात आणू देणार नाही. भाजप सरकार महिलांवर अत्याचार करत, शेतकऱ्यांवर अत्याचार करत असल्याचा आरोप सतेज पाटील यांनी केलाय. कायदे शेतकरी हिताचे होते तर तुम्ही पुढे येवून छातीठोकपणे शेतकऱ्यांना सांगायला पाहिजे होत. आमची भाजी घ्या म्हणून शेतकरी मोदी साहेबांच्या गुजरातमध्ये जाणार आहेत का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 
संपूर्ण देशातील शेतकऱ्यांची परिस्थिती एकसारखी नाही. त्यामुळे सरसकट दिल्ली मध्ये बसून बादशाही निर्णय घेता येवू नये म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांनी कृषीच्या बाबतीत वेगळे अधिकार दिले. केंद्रांन या कायद्याबाबत चर्चा करायला पाहिजे होती असे पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले. पण नरेंद्र मोदी यांची काम करण्याची पध्दत 'हम करे सो कायदा' अशी आहे. निर्बुद्धपणे निर्णय घेतले जात आहेत. मोदींचा हट्टीपणा सुरू आहे. तोच हट्टीपणा शेतीच्या कायद्याबाबत मोदी सरकारने केला. आता मोदींची वक्रदृष्टी शेतीकडे आहे. घरातील कंपन्या, घरातील सोन विकण्याची वेळ आल्याचे पृथ्वीराज म्हणाले.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a comment

0 Comments