“अन्यथा माझा पती आज जिवंत असला असता” : अन्वय यांच्या पत्नीचा आरोप

“अन्यथा माझा पती आज जिवंत असला असता” : अन्वय यांच्या पत्नीचा आरोप


 


“अन्यथा माझा पती आज जिवंत असला असता” : अन्वय यांच्या पत्नीचा आरोप


 मुंबई -  इंटिरियर डिझानयर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक  अर्णब गोस्वामींना अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात आता, 'अर्णब गोस्वामी यांच्यामुळेच पैसे थकवले गेल्याने आपल्या पतीने आत्महत्या केली अन्यथा माझा पती आज जिवंत असला असता, असा आरोप अन्वय यांच्या पत्नीने केला आहे.' त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी त्यांची मुलगीही त्यांच्यासोबत होती.


 अन्वय यांच्या मुलीने सांगितले, की संबंधित लोकांनी आपल्या पतीचे 83 लाख रुपये थकवल्याचे सांगितले. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी न्याय देणे अपेक्षित होते. आम्हाला राजकारणात पडायचे नाही. आम्हाला न्याय हवा आहे. आम्ही याआधी सर्वाना विनंती केली, तपास अधिकाऱ्यांनी दबाब आणला. आज झालेली अटक आधीच होणे गरजेचे होते. वडिलांनी रिपब्लिकचे टिव्हीचे अर्णब गोस्वामी, आयकास्ट एक्सचे फिरोज शेख आणि नितीन सार्डा या 3 जणांची नावे सुसाईड नोटमध्ये लिहिले होती. हा वडिलांचा शेवटचा प्रोजेक्ट होता.


 


आम्ही एक नागरिक म्हणून, पोलिसांवर विश्वास ठेऊन एफआयआर करतो आणि ती कचऱ्याच्या डब्ब्यात का जाते? असा सवालही यावेळी अन्वय यांच्या पत्नीने केला. यावेळी, माझ्या वडिलांना सात्याने धमक्या दिल्या जात होत्या, की तुला पैसे मिळणारच नाही आणि जे मिळाले आहेत, तेही मी कसे वसूल करतो, हे मी बघून घेईल. यासंदर्भात आमच्या कुटुंबातही चर्चा व्हायची. मी माझ्या वडिलांना पोलीसात तक्रारही करायला सांगित होते. पण तेव्हाही माझ्या वडिलांना धमक्या येत होत्या, की तुझ्या मुलीचं आणि तुझंही करिअर बर्बाद करीन. त्यांना सातत्याने प्रेशरमध्ये आणले गेले. एवढेच नाही, तर आमच्या क्लायंट्सनाही त्यांनी फूस लावली, की तुम्हीही पैसे देऊ नका. हे आम्हाला फिरोजनेही सांगितले. त्यामुळे माझ्या वडिलांकडे दुसरा पर्यायच उरला नाही, असे अन्वय यांच्या मुलीने म्हटले आहे.


 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments