मराठा समाज एकत्र येत नाही, ही सर्वात मोठी खंत : आमदार शिवेंद्रराजे भोसले

मराठा समाज एकत्र येत नाही, ही सर्वात मोठी खंत : आमदार शिवेंद्रराजे भोसले


 


मराठा समाज एकत्र येत नाही, ही सर्वात मोठी खंत : आमदार शिवेंद्रराजे भोसलेसातारा : मराठा आरक्षणासाठी निर्णायक भूमिका घेण्यासाठी मराठा संघटनांकडून रान उठवले जात आहे. याचाच एक भाग म्हणून साताऱ्यात आज गोलमेज परिषद होत आहे. मराठा समाज एकत्र येत नाही, ही सर्वात मोठी खंत असल्याची खंत भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे. साताऱ्यात आयोजित करण्यात आलेल्या विभागीय मराठा आरक्षण गोलमेज परिषदेत बोलताना शिवेंद्रराजे यांनी खंत व्यक्त केली. यावेळी बोलताना शिवेंद्रराजे म्हणाले की, सर्वांनी एकत्र यावे, मराठा आरक्षणासाठी जे काम करत आहेत त्यांच्या पाठीशी उभे रहाण्याची गरज आहे. एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली ही मराठ्यांची ताकद आहे. 


 


 


शिवेंद्रराजे म्हणाले की, मराठा आरक्षणावरून समाजातील युवा वर्गात नाराजीचे वातावरण आहे. दुर्दैवाने सर्वजण एकत्र येत नाहीत. आरक्षणाचा लढा जिंकायचा असेल तर एकत्र येऊन लढले पाहिजे. सर्व संघटनांनी एकत्र आले तरच लढा जिंकला जाऊ शकतो. या परिषदेस विविध मराठा समाजातील संघटना एकत्र येऊन लढा उभारण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ते पुढे म्हणाले, ज्यांना आरक्षणाविषयी न्यान आहे त्यांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. लोकप्रतिनिधी म्हणून येथे आलो नसून मराठा म्हणून येथे आलो आहे. इतर समाजातील आरक्षण काढून मराठा समाजाला आरक्षण द्या अशी आमची मागणी नसून आमचे आहे तेच आम्हाला द्या. असे मत आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a comment

0 Comments