कित्येक वर्षे न्यायाच्या प्रतिक्षेत असलेल्या कैद्यांच्या बाबतीत अशी तत्परता का नाही? : प्रशांत भूषण


 


कित्येक वर्षे न्यायाच्या प्रतिक्षेत असलेल्या कैद्यांच्या बाबतीत अशी तत्परता का नाही? : प्रशांत भूषण
मुंबई : अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणात अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली होती. मात्र, त्याच्या सुटकेवर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ५० हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला. अर्णबसह तिघाजणांची सुटका केली.  


सर्वोच्च न्यायालयाच्या या तातडीच्या सुनावणीबाबत ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. कित्येक वर्षे कोठडीत न्यायाच्या प्रतिक्षेत असलेल्या कैद्यांच्या बाबतीत अशी तत्परता का दाखवली जात नाही, असा सवाल भूषण यांनी विचारला आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे.Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a Comment

Previous Post Next Post