शिक्षकाबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही : शामराव ऐवळे ; आटपाडी तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने शिक्षकांची बदनामी करणाऱ्या दैनिक लोकपत्रचा जाहीर निषेध 

शिक्षकाबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही : शामराव ऐवळे ; आटपाडी तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने शिक्षकांची बदनामी करणाऱ्या दैनिक लोकपत्रचा जाहीर निषेध 


 


माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी : औरंगाबाद येथून प्रसिद्ध होणाऱ्या दैनिक लोकपत्रच्या संपादकीयमध्ये शिक्षकांबद्दल करण्यात आलेली बदनामी ही संतापजनक असून सदर दैनिकाच्या संपादकाचा आटपाडी तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला असल्याचे शामराव ऐवळे म्हणाले.


 


 


  यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले,  संपादकीय लेखात शिक्षकांच्यावर  अगदी खालच्या पातळीवरील भाषेत उल्लेख केलेला आहे. त्यांची लाज काढली आहे. विचार स्वातंत्र्य आहे म्हणून लोकांच्या भावना दुखावतील असे अपशब्द कुणाच्याही लिहणे हे कोणता अधिकार व हक्क आहे. शासनाच्या आदेशानुसार गेल्या ६ महिन्यांपासुन शाळा जरी बंद असल्या तरी सर्व शिक्षक दररोज मुलांशी संपर्क साधुन ऑनलाइन शिक्षणाचे धडे देत आहेत.


  कोरोना काळात शिक्षक बांधव पोलीसांसमवेत आपला जीव धोक्यात घालून  रात्रंदिवस चेकपोस्टवर ड्युटी करीत होते. त्यामध्ये काहींना करोनाची लागण झाली. काही शिक्षकांचा अपघातामध्ये मृत्यू झाला. शासकीय कर्मचारी म्हणून फक्त शिक्षकच तुम्हाला दिसतो का ? शिक्षकांची लाज काढली आहे. अर्वाच्य भाषेत शिक्षकांची निंदा केली आहे.


 


 त्यामुळे आटपाडी तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने दैनिक लोकपत्रचा जाहीर निषेध करीत असून येथून पुढे जरा लेखणीचे भान ठेवा असा इशारा शामराव ऐवळे यांनी दिला आहे. 


 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


Post a comment

0 Comments