Type Here to Get Search Results !

कोरोना व्हायरसचा एक नवा प्रकार ; भारतीय आरोग्य मंत्रालयाची आपत्कालीन बैठक

 



कोरोना व्हायरसचा एक नवा प्रकार ; भारतीय आरोग्य मंत्रालयाची आपत्कालीन बैठक



नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसचा एक नवा प्रकार ब्रिटनमध्ये निरीक्षणादरम्यान उघड झाल्यामुळे आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक आपत्कालीन बैठक बोलावली आहे. ब्रिटनमध्ये सध्याच्या घडीला कोरोनाचा फैलाव नियंत्रणाबाहेर असण्यास कोरोनाचा हा नवा प्रकारच जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे.



व्हायरसचा हा नवा प्रकार नियंत्रणाबाहेर असल्याचा इशारा ब्रिटनच्या शासनाकडून देण्यात आल्यानंतर युरोपियन युनियनच्या अनेक राष्ट्रांनी तेथून येणाऱ्या उड्डाणांवर आणि सर्व विमान प्रवासावर बंदी लागू केली आहे. शिवाय रविवारपासूनच ब्रिटनमध्ये सक्तीचा लॉकडाऊनही लागू करण्यात आला आहे.


 सूत्रांच्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसच्या ब्रिटनमधील या नव्या प्रकाराची माहिती मिळताच यावर चर्चा करण्यासाठी आरोग्य सेवेतील डीजीएचएस यांच्या अध्यक्षतेखाली आज एक महत्त्वाची बैठक पार पडेल. भारतात जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. रॉडरिको एच. ऑफ्रिन हेसुद्धा या बैठकीत सहभागी होण्याचा अंदाज आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies