अभिनेता कमल हसन यांचा पक्ष देणार प्रत्येक घरात संगणक आणि इंटरनेटची सुविधा मोफत
अभिनेता कमल हसन यांचा पक्ष देणार प्रत्येक घरात संगणक आणि इंटरनेटची सुविधा मोफत 


कांचीपुरम : पुढील वर्षी तामिळनाडूत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी प्रसिध्द अभिनेता कमल हसन यांनी आपल्या पक्षाचा जाहीरनामा जाहीर केला आहे. यामध्ये मोफत संगणक व इंटरनेट, गृहिणींना मासिक वेतन, हरीत तंत्रज्ञानाधारित उद्योग, कृषी क्षेत्रासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा अशी आश्वासने देण्यात आली आहेत.सध्याच्या काळात इंटरनेट आणि संगणक या मूलभूत गरज बनल्या असून त्या मिळविणे हा मूलभूत हक्क मानला जाईल. राज्यातील प्रत्येक घरात संगणक आणि १०० एमबीपीएस असलेले इंटरनेट कनेक्शन मोफत देण्यात येणार आहे. ही मनुष्यबळ क्षेत्रातील सर्वात मोठी गुंतवणूक ठरेल, असा दावा जाहीरनाम्यात करण्यात आला आहे. या सुविधेमुळे विशेषतः ग्रामीण जनतेच्या आयुष्यात क्रांतिकारी बदल घडून येतील, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे. कमल हसन यांनी स्थापन केलेला पक्ष मक्कल निधी मय्यम सत्तेवर आल्यास इंटरनेटला मूलभूत हक्क म्हणून जाहीर करणार असून प्रत्येक घरात संगणक आणि वेगवान इंटरनेटची सुविधा मोफत देणार आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad