अभिनेत्री व शिवसेना नेत्या ऊर्मिला मातोंडकर मोदी सरकारच्या निर्णयावर निशाणा साधत म्हणाल्या खरोखरच...

अभिनेत्री व शिवसेना नेत्या ऊर्मिला मातोंडकर मोदी सरकारच्या निर्णयावर निशाणा साधत म्हणाल्या खरोखरच...

 अभिनेत्री व शिवसेना नेत्या ऊर्मिला मातोंडकर मोदी सरकारच्या निर्णयावर निशाणा साधत म्हणाल्या खरोखरच...मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली. केंद्राच्या अधिवेशन रद्द करण्याच्या निर्णयावरून आता टीका होऊ लागली आहे. काँग्रेससह विरोधी पक्षांकडून सरकारला सवाल केला जात आहे. याच मुद्यावरून शिवसेना नेत्या ऊर्मिला मातोंडकर यांनीही निशाणा साधला आहे. “सर्वपक्षीय संमतीविनाच जिथे कायदे लादले जात असलेल्या संसदेशिवाय संपूर्ण देश खुला झाला आहे,” असा टोला मातोंडकर यांनी लगावला आहे.मातोंडकर म्हणाल्या, “राज्यात निवडणुका घेण्यात आल्या. त्यासाठी प्रचंड मोठ्या सभा घेण्यात आल्या. सर्व पक्षांच्या चर्चेशिवाय जिथे कायदे लादले जात आहेत, ती संसद वगळता संपूर्ण देश खुला झाला आहे. खरोखरच खूप लोकशाही आहे. (टू मच डेमोक्रसी),” असं म्हणत ऊर्मिला मातोंडकर यांनी मोदी सरकारच्या निर्णयावर निशाणा साधला आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज
Post a comment

0 Comments