“कारशेडच्या जागेच्या वादामुळे मेट्रो प्रकल्प आखणी रखडणार आहे”, याला कोण जबाबदार? : किरीट सोमय्या

“कारशेडच्या जागेच्या वादामुळे मेट्रो प्रकल्प आखणी रखडणार आहे”, याला कोण जबाबदार? : किरीट सोमय्या
“कारशेडच्या जागेच्या वादामुळे मेट्रो प्रकल्प आखणी रखडणार आहे”, याला कोण जबाबदार? : किरीट सोमय्या


मुंबई : कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडच्या जागेची स्थिती आहे तशी ठेवण्याचे निर्देश देऊन न्यायालयानं उद्धव ठाकरे सरकारला फटकारलं आहे. यावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे.आदित्य ठाकरे यांनी हायकोर्टाच्या निर्णयावर ट्वीट केलं आहे. 'आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या सविस्तर आदेशाची वाट पाहत आहोत. न्यायालयाने स्थगिती दिली आहे, हे खरं आहे.' अशी सावध प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. त्यावर किरीट सोमाय्या यांनी जोरदार निशाणा साधला आहे.किरीट सोमय्या म्हणाले , ठाकरे सरकारला मेट्रो कारशेडची अनधिकृत ऑर्डर मागे घ्यावी लागली. आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करण्यापेक्षा न्यायालयात बोलायचं होतं. ते बालिश आहेत, अशा शब्दांत जहरी टीका किरीट सोमाय्या यांनी केली आहे. तसेच ठाकरे सरकारनं जनतेची माफी मागावी, अशी देखील मागणी किरीट सोमाय्या यांनी केली आहे. मुंबई हायकोर्टाच्या निर्णय आणि कारशेडच्या जागेच्या वादामुळे मेट्रो प्रकल्प आखणी रखडणार आहे. आता याला कोण जबाबदार? असा सवालही किरीट सोमाय्या यांनी उपस्थित केला आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments