“भारत बंद” ला आटपाडीतील व्यापारी, नागरिकांचा प्रतिसाद ; अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ; एस.टी. ची वाहतूक सुरु

“भारत बंद” ला आटपाडीतील व्यापारी, नागरिकांचा प्रतिसाद ; अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ; एस.टी. ची वाहतूक सुरु“भारत बंद” ला आटपाडीतील व्यापारी, नागरिकांचा प्रतिसाद ; अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ; एस.टी. ची वाहतूक सुरु 

माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी : : पंजाब व हरियाणा येथील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या “शेतकरी विधेयक कायद्याला” विरोध म्हणून आज आटपाडी तालुक्यातील सर्व नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी “भारत बंद” मध्ये सहभागी सहभागी होत बंद यशस्वी केला.  


केंद्र सरकारने शेतील मालास उत्पादित खर्चाच्या ५० टक्के नफा धरून हमीभाव द्यावा व नवीन सुधारीत विधेयक पारित करावे यासाठी पंजाब व हरियाणा राज्यातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात दिल्ली मध्ये मोठा मोर्चा काढला असून आजपर्यंत १३ दिवस झाले शेतकरी शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत आहेत.  


त्यामुळे सरकारने शेतकरी बांधवांच्या मागण्यांचा विचार करून शेतकरी विरोधी विधेयक त्वरित रद्द करावे व शेतकरी बांधवास न्याय द्यावा या मागणीसाठी व आज विविध संघटना व राजकीय पक्ष यांच्या वतीने “भारत बंद” चे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार आज सकाळ पासून आटपाडी शहरातील व्यापारी बांधवांनी अत्यावश्यक सेवा वगळता आपली दुकाने बंद ठेवली होती. जरी “भारत बंद” असला तरी आटपाडी हे तालुक्याचे ठिकाण असल्याने शहरामधील सर्व शासकीय कार्यालये सुरु होती. परंतु नागरिकांनी घरीच राहणे पसंद केल्याने सर्व शासकीय कार्यालयात तसेच आटपाडी बाजार पटांगण, कॉलेज रोड, आबानगर चौक, या परिसरात शुकशुकाट होता.


अत्यावश्यक सेवा व तालुक्यातून बाहेर जाणाऱ्या व तालुक्यात येणाऱ्या एस.टी. बस सेवा चालू असल्याने त्याचा मोठा फायदा प्रवाशी वर्गाला झाला. एस.टी. बसेस चालू असल्याने बस स्थानक परीसरामध्ये नागरिकांची व प्रवाशांची ये-जा सुरु होती. एकंदरीत आटपाडी शहरामध्ये देशव्यापी “भारत बंद” ला मात्र मोठा प्रतिसाद मिळाला.    Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज

Post a comment

0 Comments