BIG BREAKING : भारतात आला नवीन कोरोना ; 6 रुग्ण आढळले पॉझिटिव्ह

BIG BREAKING : भारतात आला नवीन कोरोना ; 6 रुग्ण आढळले पॉझिटिव्ह

 BIG BREAKING :  भारतात आला नवीन कोरोना ; 6 रुग्ण आढळले पॉझिटिव्हमुंबई : नवीन वर्षाच्या आगमना आधीच एक धक्कादायक बातमी समोरआली आहे. भारतात कोरोनाच्या नव्या प्रकाराचे 6 रुग्ण आढळून आले आहेत. ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लक्षणं या रुग्णांमध्ये सापडली आहेत. एकूण 6 जणांच्या सॅम्पलपैकी 3 बेंगळुरूतील, 2 हैदराबादमधील तर एक पुण्यातील आढळले आहेत.या सर्व व्यक्तींना संबंधित राज्य सरकारांनी नियुक्त केलेल्या आरोग्य सेवा सुविधांमध्ये आयसोलेटेड खोलीमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांचा ज्यांच्याशी संपर्क आला आहे, त्यांना देखील क्वारंटाइन करण्यात आले आहे. सहप्रवासी, कुटुंबातील सदस्य आणि इतरांचे ट्रेसिंग केले जात आहे. भारतामध्ये नव्या कोरोनाचा शिरकाव झाल्याने राज्यातील सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.INSACOG लॅबमध्ये टेस्टिंग आणि नमुने पाठवणे, आवश्यक नजर ठेवणे, काळजी घेणे यांसारख्या बाबींमध्ये राज्यांना वेळोवेळी सल्ला देण्यात येत आहे. या परिस्थितीत विशेष काळजी घेण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments