Type Here to Get Search Results !

रिव्हॉलव्हर रोखून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणी भाजपच्या या नेत्यास तीन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा

 



रिव्हॉलव्हर रोखून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणी भाजपच्या या नेत्यास तीन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा



जयपूर :  अकलेरामधील तत्कालीन उपविभागीय दंडाधिकारी रामनिवास मेहता यांच्यावर रिव्हॉलव्हर रोखून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणामध्ये राजस्थानमधील मनोहरथाना येथील माजी आमदार असणारे भाजप नेते कंवरलाल मीणा यांना झालावर जिल्ह्यातील अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने तीन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कनिष्ठ न्यायालयाचा निकाल बदलत अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने या प्रकरणात माजी आमदाराला दोषी ठरवले. सरकारी अधिकाऱ्यावर रिव्हॉल्व्हर रोखून धरल्याचे हे प्रकरण १५ वर्ष जुने असून या घटनेनंतर आमदाराला अटक करण्यात आली होती.



याबाबत मिळालेल्या माहितीनुसार २००५ साली तत्कालीन उपविभागीय दंडाधिकारी रामनिवास मेहता यांच्यासोबत मनोहरथाना विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार असणाऱ्या कंवरलाल मीणा यांचा वाद झाला. मीणा यांनी या वादा दरम्यानच रिव्हॉल्व्हर काढून मेहता यांच्यावर रोखली. मेहता यांना जीवे मारण्याची धमकीही मीणा यांनी दिली. या प्रकरणामध्ये मनोहरथानाच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी प्रकरणामधील शक्यतांचा विचार करता २०१८ साली मीणा यांनी निर्दोष मुक्तता केली. सरकारी वकील असणाऱ्या अकलेरा यांनी या निर्णयाविरोधात अतिरिक्त जिल्हा न्यायालयामध्ये याचिका दाखल करत निकालाला आवाहन दिले होते.



या प्रकरणामध्ये सोमवारी अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने आपला निकाल दिला. अतिरिक्त जिल्हा न्यायाधिश असमी कुलश्रेष्ठ यांनी उपलद्ध साक्षीदार, नोंदवण्यात आलेले जबाब यांच्या आधारे माजी आमदाराला दोषी ठरवले. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दोन वर्षांचा तुरुंगवास आणि दंड तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल तीन पीडीपीपी अॅक्ट अंतर्गत एकूण तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies