बॉलिवूडची क्वीन कंगनाने वाहिली तामीळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांना श्रद्धांजली

बॉलिवूडची क्वीन कंगनाने वाहिली तामीळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांना श्रद्धांजली

 बॉलिवूडची क्वीन कंगनाने वाहिली तामीळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांना श्रद्धांजली मुंबई : बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत सध्या खूप चर्चेत आहे. शेतकरी आंदोलनावर ट्विट केल्यामुळे ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. यादरम्यान तिने आता आगामी चित्रपट थलाइवीच्या सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने तामीळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आज जयललिता यांची पुण्यतिथी आहे.कंगना राणौतने शेअर करत लिहिले की, जय अम्मा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने थलाइवी - द रिव्हॉल्यूशनरी लीडरमधील काही फोटो शेअर केले आहेत. माझ्या टीमचे धन्यवाद. विशेष म्हणजे आमच्या टीमचे प्रमुख विजय सर ज्यांनी सुपर ह्युमन सारखा चित्रपट पूर्ण केला. आता एक आठवडा शिल्लक राहिला आहे.

 जयललिता यांनी ५ डिसेंबर, २०१६ जगाचा निरोप घेतला. जयललिता यांनी करिअरची सुरूवात तमीळ चित्रपटात अभिनय करून केली होती. त्यानंतर राजकारणात आल्या होत्या. जयललिता तामीळनाडूच्या पाच वेळा मुख्यमंत्री राहिल्या होत्या.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज
Post a comment

0 Comments