Type Here to Get Search Results !

आज नाताळ ; राष्ट्रपतीसह मोदींनीही दिल्या देशवासियांना ख्रिसमसच्या शुभेच्छा

 




आज नाताळ ; राष्ट्रपतीसह मोदींनीही दिल्या देशवासियांना ख्रिसमसच्या शुभेच्छा



नवी दिल्ली : येशू ख्रिस्ताच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती कोविंद यांनी ट्विटद्वारे जनतेला शुभेच्छा देताना म्हटलं, “ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा! मी आशा करतो की हा सण शांती आणि समृद्धीचा प्रसार करत समाजात सौहार्द वाढवेल. चला आपण येशूच्या प्रेम, करुणा आणि परोपकारी शिकवणींचं अनुसरण करुयात. तसेच समाज आणि राष्ट्रहितासाठी संकल्पबद्ध ऱाहुयात”



तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करुन देशवासियांना नाताळाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, “मेरी ख्रिसमस! प्रभू ख्रिस्ताचे जीवन आणि तत्त्वं जगभरातील कोट्यवधी लोकांना सामर्थ्य देतात. ख्रिस्ताचा मार्ग सर्वांना न्याय्य आणि सर्वसमावेशक समाज घडविण्याचा मार्ग दाखवत राहिल. प्रत्येकानं आनंदी आणि निरोगी रहावं”



दरम्यान, कोरोनाच्या संकाटाच्या पार्श्वभूमीवर यंदा नाताळ साजरा करताना सरकारने अनेक निर्बंध घातले आहेत. तोंडाला मास्क लावणे, चर्चमध्ये प्रार्थनेसाठी २० पेक्षा अधिक लोकांची गर्दी होता कामा नये, रात्रीच्या नाताळ पार्ट्यावर निर्बंध, ६० वर्षांवरील व्यक्ती आणि लहान मुलांना शक्यतो घराबाहेर पडू नये, शक्यतो घरातच सेलिब्रेशन करावं, फिजिकल डिस्टंसिंगचे कसोशीने पालन करावे अशी नियमावली या निमित्त जाहीर करण्यात आली आहे.



Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies