“टीका करण्यात त्यांचा हात कुणी धरु शकत नाही” : शिवसेना

“टीका करण्यात त्यांचा हात कुणी धरु शकत नाही” : शिवसेना
 “टीका करण्यात त्यांचा हात कुणी धरु शकत नाही” : शिवसेनामुंबई : भाजपाचे अभ्यासू नेते कुठल्याही विषयावर अमर्याद टीका करु शकतात त्यामुळे त्यांना आता भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे. काही लोकांना पीएचडीची पदवी दिली पाहिजे असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. 
संजय राऊत म्हणाले “भाजपाला टीका करण्यासंदर्भात भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे. टीका करण्यात त्यांचा हात कुणी धरु शकत नाही. लोकांच्या जीवाचा प्रश्न आहे. ब्रिटनमध्ये काय चाललं आहे बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बऱ्याच महिन्यांमध्ये परदेशात गेलेले नाहीत. त्यामुळे जगात काय सुरु आहे ते कदाचित भाजपाच्या नेत्यांना माहित नसावं. केंद्र सरकारने ब्रिटनहून येणाऱ्या विमानांवर बंदी का घातली आहे हे कारण जरा अभ्यासू नेत्यांनी तपासावं” असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपावर टीकेची तोफ सोडली आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments