म्हसवड येथील मंगळवार १५ डिसेंबर रोजी होणारी सिद्धनाथ रिंगावण यात्रा रद्द

म्हसवड येथील मंगळवार १५ डिसेंबर रोजी होणारी सिद्धनाथ रिंगावण यात्रा रद्दम्हसवड येथील मंगळवार १५ डिसेंबर रोजी होणारी सिद्धनाथ रिंगावण यात्रा रद्द

माणदेश एक्सप्रेस न्युज


म्हसवड/अहमद मुल्ला : म्हसवड येथील मंगळवार १५ डिसेंबर रोजी होणारी सिद्धनाथ रिंगावण यात्रा रद्द करण्यात आली असून  म्हसवड शहर परीसरात १४ ते १६ डिसेंबर अखेर संचारबंदी लागू करण्यात आली आहे.


प्रशासनाच्या या निर्णयामुळे  दि. १३ रोजी सायंकाळी शहरातील प्रमुख रस्ते व यात्रा पटांगणात वरिष्ठ अधिकाऱ्यासमवेत पोलीस व राज्य राखीव पोलीस दलासह गृहरक्षक दलाचे संचलन करण्यात आले.


प्रत्येक वर्षी परंपरागत देवदिवाळीस श्रीसिद्धनाथ जोगेश्वरी देवस्थानच्या उत्समुर्तीची रथातून नगरप्रदक्षीना काढली जाते. या रथोत्सव मिरवणूकीसाठी राज्यभरातून सुमारे पाच लाख भाविकांची उपस्थिती असते.


सध्या संपूर्ण जगासह भारतात कोरोना विषाणूचा प्रदुर्भाव सूरु आहे. यात्रा कालावधीत म्हसवड शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात भाविक येण्याची शक्यता आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता असल्याने ही यात्रा रद्द करण्यात आली असून संपूर्ण शहरात दि १४ ते १६ डिसेंबर अखेर तीन दिवस जमावबंदी व संचारबंदी आदेश जारी करण्यात आला आहे.


या आदेशानुसार पोलीसांनी  म्हसवड शहरात संचलन केले. यात्रा मैदान म्हसवड शहरास जोडले गेलेले सर्व रस्ते सील करुन वाहतुकीस बंद करण्यात आले आहेत. यात्रा मैदानातून ये-जा करणारी सर्व वाहतूक आज बंद केली असून सर्व वाहने हिंगणी-राजेवाडी मार्गे दिघंची आटपाडीकडे पर्यायी मार्गाने जातील. दिघंची वरकुटे मलवडी कडून होणारी वहातूक म्हसवड येथील मेघासिटी नजिकच्या रस्त्याने मसाई बोनेवाडीमार्गे सातारा रस्त्यावरुन पुढे दहिवडी, फलटण, साताराकडे जाण्याची पर्यायी सुविधा केली असल्याचे  म्हसवड पोलीस ठाण्याकडून सांगण्यात आले आहे.


Join Free Whatasup Group माणदेश एक्सप्रेस


Post a comment

0 Comments