“मराठा आरक्षणच्या बाबतीत राज्य शासन गंभीर नाही” : भाजप नेत्यांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप

“मराठा आरक्षणच्या बाबतीत राज्य शासन गंभीर नाही” : भाजप नेत्यांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
 “मराठा आरक्षणच्या बाबतीत राज्य शासन गंभीर नाही” : भाजप नेत्यांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप  मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ९ डिसेंबरला झालेल्या सुनावणीत या आरक्षणावरील स्थगिती सुप्रीम कोर्टाने कायम ठेवली. त्यानंतर, मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या बाबतीत राज्य शासन गंभीर नसल्याचे आरोप राज्यातील भाजपा नेत्यांकडून पाहायला मिळाले. महत्त्वाची सुनावणी असताना राज्य सरकारचा एकही मंत्री किंवा महाधिवक्ता दिल्लीत सुनावणीला हजर नसल्याच्या मुद्द्यावरूनही खूप टीका करण्यात आली. त्यानंतर आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारला इशारा दिला.प्रवीण दरेकर यांनी एक व्हिडीओ ट्विट केला. त्यात काही मराठा तरूण आंदोलन करताना दिसले. एक मराठा, लाख मराठा अशी घोषणाबाजीही होताना दिसली. यासोबतच त्यांनी एक ट्विटदेखील केलं आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी सरकारला इशारा दिला आहे. “आघाडी सरकारचं मोघलाईचं राज्य सुरु आहे. आंदोलनकर्त्या मराठा तरुणांवर केसेस दाखल करण्यात आल्या. अधिवेशन चालू असताना लोकशाही मार्गाने आंदोलनासाठी मुंबईत येणाऱ्या मराठा तरुणांना ठिकठिकाणी अडवण्यात येत आहे. तरुणांच्या संयमाचा अंत पाहू नका,” असा इशारा त्यांनी ठाकरे सरकारला दिला.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज
Post a comment

0 Comments