रोहित पवारांच्या आजोबाना ट्विट करत खास शुभेच्छा

 



रोहित पवारांच्या आजोबाना ट्विट करत खास शुभेच्छा 



मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे नातू व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत त्यांना शुभेच्छा दिल्या. ‘महासागराप्रमाणे खोली आणि हिमालयाप्रमाणे उंची असलेला आमचा आधारवड! आदरणीय पवार साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. शतायुषी व्हा आणि माझ्यासारख्या युवांना आणि नव्या पिढीला कायम मार्गदर्शन करत रहा’, असं ट्विट रोहित पवारांनी केलंय.



कोणत्याही संकटापुढे झुकायचं नाही ही शिकवण आजोबांकडून मिळाल्याचं रोहित पवार यांनी एका कार्यक्रमात सांगितलं होतं. “अनेक लोकांना शरद पवार निवृत्त होतील असं वाटलं होतं. पण ते म्हणाले आपण हार मानायची नाही. कितीही संकटं आली तरी झुकायचं नाही, प्रामाणिक वागा, लोकांमध्ये जा, मग कोणीही तुमचा पराभव करु शकत नाही, हे पवार साहेबांकडे पाहून आम्हाला कळतं”, असं ते म्हणाले.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज







Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad