राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना धमकीचा फोन

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना धमकीचा फोन




राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना धमकीचा फोन



पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना त्यांचे कार्यालय तोडून आणि जाळून टाकण्याचा धमकीचा फोन आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून चाकणकर यांनी याप्रकरणी तात्काळ सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.



रुपाली चाकणकर यांचे धायरी येथे कार्यालय आहे. या कार्यालयात शुक्रवारी सायंकाळी सदर व्यक्तीनं फोन करुन कार्यालय पेटवून देतो अशी धमकी दिली. धमकीचा फोन आला तेव्हा रुपाली चाकणकर कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. त्या माघारी परतल्यानंतर सदर घडलेला प्रकार स्वीय सहाय्यक राजदीप कठाळे यांनी रुपाली चाकणकर यांना सांगितला. त्यानंतर चाकणकर यांनी सरळ सिंहगड रस्ता पोलीस स्टेशन गाठलं. सदर व्यक्ती विरोधात तक्रार दिली. तक्रारीच्या आधारावर सिंहगड पोलिसांनी सदर व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


 

मी सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास असून पोलीस याबाबत तपास करत आहेत, असं चाकणकर म्हणाल्या. समाजात अशा विकृत व्यक्ती जन्माला येतात, त्यांना ठेचून काढलं पाहिजे. कायद्याच्या चौकटीत राहून अशा विकृतींना धडा शिकवला पाहिजे, असं सांगतानाच पोलीस योग्य तपास करतीय यावर माझा विश्वास असल्याचंही त्यांनी सांगितलं.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज



 

Post a comment

0 Comments