VIDEO: चहलच्या होणाऱ्या पत्नीचा भन्नाट डान्स तुम्ही पाहिलात का?

VIDEO: चहलच्या होणाऱ्या पत्नीचा भन्नाट डान्स तुम्ही पाहिलात का?


 

VIDEO: चहलच्या होणाऱ्या पत्नीचा भन्नाट डान्स तुम्ही पाहिलात का?  


मुंबई  :  भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आपल्या फिरकी गोलंदाजीने चाहत्यांना आनंदित केले. तो यू-ट्युबर धनश्री वर्मासोबत कधी लग्नाच्या बेडीत अडकणार याची सर्वत्र चर्चा रंगल्याचे दिसत आहे. धनश्री दुबईला IPLच्या सामन्यांना हजेरी लावताना दिसली. पण IPL संपल्यानंतर युजवेंद्र चहल ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाला आणि धनश्री पुन्हा भारतात परतली. सध्या धनश्री एका नव्या कोऱ्या गाण्यावरील डान्समुळे प्रचंड चर्चेत आहे.धनश्रीने आपल्या इन्स्टाग्रांम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात ती एका स्टु़डिओमध्ये डान्स करताना दिसते आहे. बॉलिवूडची क्यूट अभिनेत्री कियारा अडवाणी हिचा इंदू की जवानी हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटातील ‘हिलें टूट गयीं’ नावाचं एक गाणं सध्या चांगलंच गाजतंय. या नव्या कोऱ्या गाण्यावर कियाराने पाश्चात्य प्रकारचा सुंदर डान्स केला आहे. याच गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ धनश्रीनेदेखील पोस्ट केला आहे. या व्हिडीओला १० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळालेले आहेत. सध्या धनश्रीचा हा डान्स चांगलाच चर्चेचा विषय ठरताना दिसतो आहे.


Join Free Whatasup Group माणदेश एक्सप्रेस

Post a comment

0 Comments