‘केंद्रीय कृषी मंत्र्यांकडून पाठवण्यात आलेलं कोणतंही पत्र आम्हाला मिळालेलं नाही’ : शेतकरी संघटना
 ‘केंद्रीय कृषी मंत्र्यांकडून पाठवण्यात आलेलं कोणतंही पत्र आम्हाला मिळालेलं नाही’ : शेतकरी संघटना नवी दिल्ली : केंद्र सरकारने आत्तापर्यंत शेतकरी नेत्यांशी भवनात घेतलेल्या तीन बैठका अपयशी ठरल्यानंतर, रविवारी रात्री उशिरा कृषी मंत्रालयाकडून ४० शेतकरी नेत्यांना पुन्हा चर्चेसाठी आमंत्रणाचे पत्र पाठवले गेले. शेतकरी संघटनांनी बैठकीची तारीख निश्चित करावी असेही केंद्राकडून कळवण्यात आलं होतं. मात्र, चर्चेसाठी पाठवण्यात आलेलं पत्र मिळालंच नसल्याचं शेतकरी संघटनेकडून सांगण्यात आलं आहे.भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टकैत म्हणाले,”केंद्रीय कृषी मंत्र्यांकडून पाठवण्यात आलेलं बैठकीला उपस्थित राहण्यासंदर्भातील कोणतंही पत्र आम्हाला मिळालेलं नाही. केंद्र सरकार जोपर्यंत तीन कायदे मागे घेत नाही, तोपर्यंत घरी न जाण्याचा निश्चय शेतकऱ्यांनी केला आहे. सर्व मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी महिन्यापेक्षा अधिक काळ लागेल. चर्चेसाठी सरकारनं आमच्याकडे यावं,” असं टकैत यांनी म्हटलं आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad