“100 कोटी म्हणजे गोळ्या-बिस्कीट नाहीत” : गोपीचंद पडळकर

“100 कोटी म्हणजे गोळ्या-बिस्कीट नाहीत” : गोपीचंद पडळकर
 “100 कोटी म्हणजे गोळ्या-बिस्कीट नाहीत” : गोपीचंद पडळकर


पिंपरी-चिंचवड : भाजपकडून मला पक्षप्रवेशाची 100 कोटीचीऑफर देण्यात आली होती, असा गौप्यस्फोट  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केला होता. या दाव्यानंतर आता भाजपचे विधान परिषदेचे आमदार यांनी उत्तर दिले आहे.100 कोटी म्हणजे गोळ्या-बिस्कीट नाहीत, जे यांना देतील, असा टोला गोपीचंद पडळकरांनी शशिकांत शिंदेंना लगावला आहे. काही लोकांचा काहीतरी बोलून राष्ट्रवादीत स्थान बळकट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुळात हे निवडणूक हरलेले आहेत, त्यांना कोण कशासाठी पैसे देईल? असा सवाल देखील पडळकरांनी उपस्थित केला.


काहीतरी विधान करून मी राष्ट्रवादीत कसा प्रामाणिक आहे, बाहेरचे लोक बोलवत असताना देखील मी गेलो नाही, हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे, असे म्हणत पडळकरांनी शिंदेंवर निशाणा साधला. अशा गोष्टी जास्त गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे देखील पडळकर म्हणाले. पिंपरी-चिंचवड शहरात ते बोलत होते.


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस

Post a comment

0 Comments