‘माजी मुख्यमंत्र्यांची “मी पुन्हा येणार” म्हणण्याची सवय ट्रम्पला’ : “या” काँग्रेस नेत्याची फडणवीसांवर टीका

नांदेड :  आपली नकोशी अशी सवय तिकडे गेली आहे, अशा शब्दात काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे.

नादेंडमधील उमरी येथील प्रसिद्ध उद्योजक मारोतराव कवळे गुरूजी यांनी अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी अशोक चव्हाणांनी टोलेबाजी केली.

नांदेडमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले. लोकांमध्ये चैतन्य निर्माण झाले असून, सरकार आपले आहे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रीमंडळ आपले आहे. मी पुन्हा येणार म्हणणाऱ्याला बाहेर ठेवण्याचे काम महाविकास आघाडीने केले. माजी मुख्यमंत्र्यांची मी येणार म्हणण्याची सवय ट्रम्पला लागली. ट्रम्प जाताजाता मी पुन्हा येणार म्हणून गेले, आपल्या नको त्या सवयी तिकडे गेल्या आहेत, असा टोला चव्हाण यांनी फडणवीसांना लगावला.

Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस

Post a comment

0 Comments