Type Here to Get Search Results !

म्हसवडमध्ये बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरीम्हसवडमध्ये बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

माणदेश एक्सप्रेस न्युज


म्हसवड/अहमद मुल्ला : तमाम शिवसैनिकांचे श्रद्धास्थान हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ९५ वी जयंती व नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५ वी जयंती म्हसवड शहर शिवसेनेच्या व युवासेनेच्या वतीने साजरी करण्यात आली.
शिवसेनेचे माण विधानसभा संपर्क प्रमुख तथा ठाणे उपजिल्हाप्रमुख शंकरभाई विरकर यांचे जनसंपर्क कार्यालय येथे शिवसेनेचे सातारा उपजिल्हाप्रमुख संजय भोसले, नगराध्यक्ष तुषार विरकर, माण तालुकाप्रमुख बाळासाहेब मुलाणी, महिला आघाडी संघटिका सौ.पुनम माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष युवराज सुर्यवंशी, मेडिकल असोसिएशन चे अध्यक्ष डॉ.राजेंद्र मोडासे, पत्रकार एल.के. सरतापे, माजी तालुकाप्रमुख बाळासाहेब मदने, मार्केट कमिटीचे सदस्य कैलास भोरे, नगरसेवक संग्राम शेटे इत्यादी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते जयंतीनिमित्त मायणी येथील डॉ.संजय रायबोले यांच्या रक्तपेढीच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. शिबीरामध्ये ४५ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. रक्तदान करण्यासाठी महिलांचाही प्रतिसाद मिळाला. त्यानंतर रुग्णांना फळे वाटप, पानवन येथील रमाताई तोरणे यांच्या अनाथाश्रमातील चिमुकल्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक आप्पा विरकर, डॉ.राजेश शहा, अॅड.अभिजीत केसकर, संजय भागवत, संजय टाकणे, पत्रकार नागनाथ डोंबे, जेष्ठ शिवसैनिक हनिफ मुल्ला, रमेश महामुनी, चंद्रकांत गुरव, मनोहर डोंगरे, बाळासाहेब लोहार, महादेव खाडे, बबन गुरव, उपतालुकाप्रमुख शिवदास केवटे, अंबादास शिंदे, विभागप्रमुख अमित कुलकर्णी, उपशहरप्रमुख आनंद बाबर, सचिन भोकरे, युवासेना उपशहराध्यक्ष आदित्य सराटे, शाखाप्रमुख सतिश विरकर, प्रितम तिवाटणे, गजानन ढगे, सिध्दनाथ कवी, लखन मंडले, सागर शिंदे, सोशल मिडिया प्रमुख सोनु मदने, दाऊद मुल्ला, सचिन चिंचकर, बाळासाहेब ढेरे, दादा कलढोणे, प्रतिक ओतारी, अक्षय धट, बाळराजे विरकर, संतोष कोरडे, लक्ष्मण लोहार, प्रथमेश गुरव,विजय गुरव तसेच शिवसैनिक, पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहरप्रमुख राहुल मंगरुळे यांनी तर आभार युवासेना शहराध्यक्ष सोमनाथ कवी यांनी मानले.


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेसPost a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies