यूकेमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी नवी नियमावली जाहीर

यूकेमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी नवी नियमावली जाहीर

 यूकेमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी नवी नियमावली जाहीरनवी दिल्ली : ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यूकेमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी नवी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जाहीर केली आहे. भारताने आठवडाभरासाठी यूकेला जाणाऱ्या विमान प्रवासावर तात्पुरती बंदी घातली होती. त्यानंतर ८ जानेवारीपासून ही बंदी उठवण्यात येणार आहे. त्यामुळे या दिवसापासून युकेतून भारतात येणाऱ्या प्रवाशांना काही विशिष्ट नियमांचे पालन करावे लागणार आहे.८ जानेवारी ते ३० जानेवारी २०२१ या कालावधीसाठी ही नवी एसओपी लागू असणार आहे. त्याचबरोबर या काळात युकेमधून भारतात येणाऱ्या विमानांतील प्रवाशांसाठी विमानतळांवर पुढील कारवाई केली जाणार आहे. डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशननं विमान कंपन्यांना आदेश दिले आहेत की, यूकेतून भारतात येणाऱ्या फ्लाईट्समध्ये विशिष्ट कालावधींचं अंतर ठेवावं लागणार आहे. कारण, पहिल्या फ्लाईटमधून आलेल्या प्रवाशांनंतर त्यांची तपासणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत विमानतळांवर गर्दी होणार नाही याची काळजी विमान कंपन्यांना घ्यावी लागणार आहे. यूके ते भारत या प्रवासादरम्यान ट्रान्झिट एअरपोर्ट किंवा तिसऱ्या देशातून प्रवाशांना प्रवेश देऊ नये याची कंपन्यांनी काळजी घ्यायची आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments