आटपाडी तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण दिनांक २९ रोजी होणार : तहसिलदार सचिन लंगुटे

आटपाडी तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण दिनांक २९ रोजी होणार : तहसिलदार सचिन लंगुटेआटपाडी तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण दिनांक २९ रोजी होणार : तहसिलदार सचिन लंगुटे 


आटपाडी : आटपाडी तालुक्यातील असणाऱ्या ५६ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची सोडत दिनांक २९ रोजी दुपारी ३.०० वा. आटपाडी पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात ठरविण्यात येणार असल्याची माहिती आटपाडीचे तहसिलदार सचिन लंगुटे यांनी दिली.
आटपाडी तालुक्यात एकूण ५६ ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची सोडत काढण्यात येणार आहे. यामधून कोणत्या गावात कोणते सरपंच आरक्षण पडणार हे समजणार आहे. त्यामुळे आटपाडी तालुक्यातील जास्तीत-जास्त नागरिकांनी सरपंच पदाच्या आरक्षण कार्यक्रमासाठी उपस्थित रहाण्याचे आवाहन तहसिलदार सचिन लंगुटे यांनी केले आहे.   


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस
Post a comment

0 Comments