नियमांचे उल्लंघन केल्याने आमदार अमोल मिटकरी यांच्यासह 300 ते 400 जणांवर गुन्हा दाखल

नियमांचे उल्लंघन केल्याने आमदार अमोल मिटकरी यांच्यासह 300 ते 400 जणांवर गुन्हा दाखल


 नियमांचे उल्लंघन केल्याने आमदार अमोल मिटकरी यांच्यासह 300 ते 400 जणांवर गुन्हा दाखलअकोला : अकोल्यातील अकोट तालुक्यातील कुसाटा गावात विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीसाठी शेकडो लोक उपस्थित होते. कोरोना नियमांचं उल्लंघन केल्यामुळे अमोल मिटकरी यांच्यासह अनेक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
आमदार अमोल मिटकरी यांच्या उपस्थितीत शिवजयंतीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीला शेकडो लोक उपस्थित होते. या मिरवणुकीत सरकारने घालून दिलेल्या कोरोना नियमांचं उल्लंघन करण्यात आलं. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवण्यात आले. या प्रकरणी दहीहंडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार अमोल मिटकरी यांच्यासह 300 ते 400 जणांवर हा गुन्हा दाखल झालाय.

Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेसPost a Comment

0 Comments