“एखाद्याला अक्कल नाही हे लक्षात आल्यानंतर त्याला किती अपमानित करायचं?” : भाजप नेत्याची राहुल गांधींवर टीका

“एखाद्याला अक्कल नाही हे लक्षात आल्यानंतर त्याला किती अपमानित करायचं?” : भाजप नेत्याची राहुल गांधींवर टीका

 मुंबई : पुदुच्चेरीच्या दौऱ्यावेळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी मच्छिमारांसाठी स्वतंत्र मंत्रालय असावे, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर भाजप नेत्यांनी त्यांना आधीपासूनच मच्छिमारांसाठी स्वतंत्र मंत्रालय असल्याची आठवण करून दिली. तुम्हाला इतकं तरी माहीत असायलाच हवे, की 31 मे 2019 रोजीच मोदीजींनी नवीन मंत्रालय स्थापन केले आहे, अशा शब्दात केंद्रीय मस्त्यपालन मंत्री गिरीराज सिंह यांनी त्यांना सुनावले आहे.
तर,भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी देखील यावरून राहुल गांधींची खिल्ली उडवली आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षाला भारत सरकारचे मत्स्य पालन मंत्रालय आहे हे माहित नाही. मीडियाने तरी असे ‘संवेदनशील’ विषय चव्हाट्यावर आणू नयेत. एखाद्याला अक्कल नाही हे लक्षात आल्यानंतर त्याला किती अपमानित करायचं याला काही मर्यादा आहे की नाही?, असा जोरदार टोला भातखळकरांनी लगावला आहे.


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
Post a Comment

0 Comments