आटपाडीत शिवजयंती निमित्त स्वाती शिंदे यांचे व्याख्यान

आटपाडीत शिवजयंती निमित्त स्वाती शिंदे यांचे व्याख्यानआटपाडी : आटपाडी येथे शिवजयंती निमित्त लेखिका, कवयित्री स्वाती शिंदे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सदरचे व्याख्याने हे शिवस्वराज्य मंडळ आणि शिवभक्तप्रेमी यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आज शुक्रवार दि.१९ रोजी आयोजित करण्यात आले आहे.
आटपाडी येथील भारते मल्टिपर्पज हॉलमध्ये सायंकाळी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते अभिवादन केले जाईल. सायंकाळी ६ वाजता लेखिका स्वाती शिंदे यांचे  'चल जिजाऊ होवुया, पुन्हा शिवाजी घडवुया,' या विषयावर व्याख्यान होणार आहे.
तालुक्यातील आणि शहरातील शिवप्रेमींनी प्रा.विष्णू जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन शिवस्वराज्य मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.Post a comment

0 Comments