Type Here to Get Search Results !

‘या’ टिकटॉक स्टारची गळफास घेत आत्महत्या


 ‘या’ टिकटॉक स्टारची गळफास घेत आत्महत्या 


पुणे : टिकटॉक स्टार समीर गायकवाड याने रविवारी घरातील पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. रविवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. प्रेमप्रकरणातून त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे. समीर गायकवाड हा पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता.पुणे शहरातील वाघोलीतील केसनंद रस्त्यावरील मिकासा सोसायटीत टिकटॉक स्टार समीर मनीष गायकवाडने रविवारी सायंकाळच्या सुमारास राहत्या घरात पंख्याला साडीच्या मदतीने गळफास लावला, अशी माहिती लोणीकंद पोलिसांनी दिली आहे. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. 
समीरने आत्महत्या केल्याचं कळताच प्रफुल्ल गायकवाडने लोणीकंद पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर समीरला खाली उतरवून तात्काळ लाईफ लाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याने आत्महत्या का केली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

रविवारीच समीरनं आपल्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा त्याचा शेवटचा व्हिडीओ ठरला. या व्हिडीओमध्ये तो लोकांना एकमेकांना मागे न खेचता सहकार्य करून पुढं कसं जाता येतं, याबद्दल सांगत आहे. इतकी सकारात्मक पोस्ट शेअर करून आणि इतरांना सकारात्मकता शिकवून हा चुकीचा निर्णय का घेतला, असा सवाल समीरचे चाहते त्याच्या पोस्टवर कमेंट करत विचारत आहेत.समीरच्या या निर्णयानं सगळ्यांनाच धक्का बसला आहे. सुसाईड नोटही सापडली नसल्यानं त्यानं आत्महत्या करण्याचा निर्णय का घेतला, हे स्पष्ट होऊ शकलं नाही. समीरच्या भावानं याबद्दल पोलिसांनी माहिती देताच पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. 


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies