“विधानसभा अध्यक्ष निवडणूक लांबणीवर टाकायची आहे, म्हणून कोरोनाची भीती दाखवली जात आहे” : मनसे

“विधानसभा अध्यक्ष निवडणूक लांबणीवर टाकायची आहे, म्हणून कोरोनाची भीती दाखवली जात आहे” : मनसे
 “विधानसभा अध्यक्ष निवडणूक लांबणीवर टाकायची आहे, म्हणून कोरोनाची भीती दाखवली जात आहे” : मनसे 


मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांना मागील काही दिवसात कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. मात्र आता यावर शंका उपस्थित करत अचानक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह कसे येतात? असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.
संदीप देशपांडे म्हणाले की, फक्त अचानक अमरावतीमध्ये आकडे कसे वाढले? अचानक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह कसे येतात? हा तर सरकारचा नियोजनबद्ध कार्यक्रम आहे. मुख्यमंत्री साहेबाना घरी थांबायचं आहे, म्हणून कोरोनाचे आकडे वाढून सांगता का? तुम्हाला घरी बसायचं आहे तर बसा पण लोकांना लॉकडाऊनची भीती दाखवू नका, असे संदीप देशपांडे म्हणाले.
सध्या कोरोनाचा नवीन स्ट्रेन आला आहे. त्याचं नाव विधिमंडळ अधिवेशन कोरोना असं आहे. जो शरीरावर कमी, पण स्वातंत्र्यावर अधिक परिणाम करतो, असा जोरदार टोला लगावतानाच अधिवेशनात सरकारला प्रश्नांची उत्तरं द्यायची नाहीत, विधानसभा अध्यक्ष निवडणूक लांबणीवर टाकायची आहे, म्हणून कोरोनाची भीती दाखवली जात आहे, असा आरोप देखील देशपांडे यांनी केला आहे.


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेसPost a comment

0 Comments