Type Here to Get Search Results !

“शाळा-महाविद्यालये आणि परीक्षांचं काय होणार?” : उदय सामंत यांनी दिले स्पष्टीकरण




 “शाळा-महाविद्यालये आणि परीक्षांचं काय होणार?” : उदय सामंत यांनी दिले स्पष्टीकरण


मुंबई : कोरोनाचा प्रसार वाढला असून, राज्य सरकारबरोबरच स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. राज्यातील पुणे, नागपूर, अमरावतीसह काही जिल्ह्यात पुन्हा निर्बंध घालण्यात आले असून, शाळा-महाविद्यालये सुरू ठेवणार की बंद करणार हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. महाविद्यालये आणि परीक्षांचं काय होणार अशीही चर्चा केली जात असून, त्याबद्दल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.




 “कोरोनाचे रुग्ण वाढत असतील, कंटेनमेंट झोन होणार असतील. तर जिल्हाधिकारी हे जिल्ह्याचे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख आहेत. त्यांना जिल्ह्याची परिस्थिती माहिती असते. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असेल किंवा त्याचा फटका विद्यार्थी व शिक्षकांना बसणार असेल, तर कुलगुरुंनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करावी आणि महाविद्यालयं सुरू ठेवण्याचा निर्णय दोघांनी घ्यावा,” अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies